मेष
आठवड्याच्या सुरुवातीस आपण काही दबावाखाली आल्याने स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी आपणास सतत प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास कारकिर्द किंवा व्यावसायिक स्तरावर आपली प्रगती मंदावत असल्याचा अनुभव येईल व जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर आपणास पद गमवावे लागण्याची सुद्धा शक्यता आहे. असे असले तरी उत्तरार्धात आपण पुन्हा जोमाने व ठोस व्यूहरचना करून अनेक कार्ये पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यात असल्याचे सिद्ध करून दाखवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चढ - उताराचा सामना करावा लागेल. आठवड्याच्या सुरवातीचे दिवस त्यांच्यासाठी जरी अनुकूल असले तरी मधल्या दिवसात मनाच्या चांचल्यामुळे अभ्यास मना सारखा होऊ शकणार नाही. संबंधात अति खर्च करून किंवा खर्चिक भेटवस्तू दिल्याने आनंद मिळतोच असे नाही हे आपणास लक्षात ठेवावे लागेल. त्यामुळे आपल्या प्रणयी संबंधात वास्तविकतेस सुद्धा महत्व देणे गरजेचे आहे. हि गोष्ट समजल्याने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी प्रणयी संबंधात किंवा वैवाहिक जोवनात घनिष्ठतेसाठी आपल्या जोडीदारास अधिक वेळ देऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास जितक्या उष्मांकाचा दैनिक आहार घेता त्याहून कमी उष्मांकाचा आहार आपण घ्यावा. ह्या दरम्यान चरबीयुक्त व तळलेले पदार्थ खाणे टाळावे. वाणी सुद्धा संयमित ठेवावी.
वृषभ
आठवड्याच्या सुरुवातीस आपण कामावर विशेष लक्ष द्याल व आपली बहुतांश कार्ये किंवा निर्णय हे कारकिर्दीच्या प्रगतीशी संबंधित असतील. व्यापारासाठी आठवड्याच्या उत्तरार्धातील स्थिती हि मिश्र फलदायी असेल. ह्या दरम्यान आर्थिक नियोजनाकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याने आवश्यक खर्चाची तरतूद आधी पासूनच करून ठेवावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरवातीस अध्ययनात थोडा अडथळा आला तरी उत्तरार्धात अभ्यास चांगला होऊ शकेल. मात्र, सध्या इतर प्रवृत्तीतील सहभाग आपणास कमी करावा लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्यासाठी संबंधांचे महत्व जास्त असल्याने आपल्या प्रियव्यक्तीचा सहवास न लाभल्यास आधुनिक माध्यमांच्या मदतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण कराल. उत्तरार्धात सार्वजनिक जीवनात आपली सक्रियता वाढेल. विवाहेच्छुकांना अशा एखाद्या संमेलनातून योग्य जोडीदार मिळू शकेल. आठवड्याच्या सुरवातीस आपणास स्फूर्ती व चुस्ती जाणवेल. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात आपणास आधीपासून काही आजारपण असल्यास आपण जे काही उपचार घेत असाल ते कायम ठेवूनच फायदा होणार असल्याने उपचारात बदल करू नये. आरोग्याची सुद्धा अधिक काळजी घ्यावी लागेल.
मिथुन
आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत आपल्या व्याकुळतेमुळे आपण कोणत्याही कार्यात स्थिर होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत आरोग्य विषयक काही त्रास सुद्धा होऊ शकतो. मात्र, दुपार नंतर ग्रहस्थिती अनुकूल झाल्यामुळे आपण पूर्ण उत्साहाने जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी व लक्ष्यांक गाठण्यासाठी प्रयत्नशील व्हाल. देशांतर्गत कार्याशी संबंधित व्यक्तींसाठी पूर्वार्धात तेज व सकारात्मक क्रियाकलापाची शक्यता आहे. सध्या आपण व्यावसायिक आघाडीवर उत्साहाने वाटचाल करून त्यात विशेषतः जमीन, वास्तू, मशीनरी, वाहन इत्यादी कार्यात अधिक प्रगतीची अपेक्षा बाळगू शकता. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर करून परिपकवतेने एकमेकांच्या भावना समजू शकाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा मध्यम फलदायी असून त्यात आपल्यात अहंकार आडवा येणार नाही ह्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. पहिल्या दिवसाच्या दुपार पर्यंतची वेळ वगळता प्रकृती उत्तम राहील.
कर्क
आठवड्याच्या सुरुवातीस आपण किती संबंध युक्तिपूर्वक सांभाळू शकता हे बघावे लागेल. ह्या दरम्यान आपणास स्वतःला स्पष्टपणे व्यक्त करण्याची गरज वाटल्याने आपला वार्तालाप व संभाषण अधिक उबदार होईल. आपण प्रणयी संबंधात अधिक सुरक्षिततेची अपेक्षा बाळगाल. आठवड्याच्या पूर्वार्धात आपल्या आरोग्याची स्थिती नाजूक व सुस्तीयुक्त राहील. जर आपणास पाय किंवा सांध्यांशी संबंधित समस्या असली तर ती वाढण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात नोकरी किंवा व्यवसायात प्रत्यक्ष किंवा परोक्षपणे फायदा होऊ शकेल. दूरवरची कामे त्वरित होतील. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आपण ह्या समस्या सकारात्मक दृष्टिकोनातून सोडविण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक आघाडीवर सुरवातीस खर्चाची व उत्तरार्धात प्राप्तीची शक्यता असल्याने आठवड्याच्या अखेरीस आपल्या जमाखर्चाची बाजू समतोल राहील. आठवड्याच्या सुरवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष कमी लागले तरी उत्तरार्धात नियोजनपूर्वक वाटचाल करू शकाल.
सिंह
व्यावसायिक आघाडीवर सध्या विरोधकांचे फासे उलटे पडतील व कामाप्रती असलेली आपली कटिबद्धता त्यांना जेरीस आणण्यात मदतरूप ठरेल. सध्या आपल्या वाणीतील गोडव्यामुळे कामात व संबंधात घनिष्ठपणा निर्माण करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण आपल्या स्वभावानुसार मित्र व आप्त ह्यांच्यात वैभवी जीवन जगू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रियव्यक्तीच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी अनुकूल आहेत. मात्र, चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस व वाईट दिवसानंतर पुन्हा चांगले दिवस येतच असतात, म्हणून ह्या सर्वांमुळे जीवन किंवा व्यवसाया प्रती आपण बेफिकीर राहू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात आपले मन व्याकुळ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपणास निर्णय घेणे कष्टप्रद होण्याची व एखाद्याशी संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आहे. कदाचित आपले म्हणणे स्पष्टपणे मांडल्याने अडचणींना आमंत्रित कराल. विद्यार्थ्यांचा अभ्यास सध्या शिस्तबद्ध पद्धतीने झाला तरी त्यांना अभ्यासाचे तास वाढवावे लागतील. आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल.
कन्या
आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण प्रेमसंबंध किंवा वैवाहिक संबंध ह्याकडे अधिक लक्ष देऊ शकाल. त्यामुळे आपल्यात जवळीक वाढेल. ह्या आठवड्यात ग्रहस्थिती आपणास अनुकूल असल्याचे चेहऱ्यावरून दिसून येईल. तसेच ह्या आठवड्यात आपण सौंदर्य प्रसाधने किंवा सौंदर्योपचार ह्यावर अतिरिक्त खर्च करण्याची शक्यता आहे. आपण चर्चा - विचारणा करण्यात सहभागी होऊ शकाल, मात्र त्यात आपणास अहंकार सोडून द्यावा लागेल. आठवड्याच्या सुरवातीस नोकरी करणाऱ्यांना स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकेल. आपल्या प्रगतीची शक्यता अधिक प्रबळ होईल. किरकोळ काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचा पूर्वार्ध आशादायी आहे. भागीदारीत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणताही संयुक्त निर्णय घेताना क्रोधावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण सांसारिक बाबींना बाजूस सारून आध्यात्मिकतेकडे वळाल. गूढ व रहस्यमय विद्यांप्रती आकर्षित व्हाल. खोलवर मनन - चिंतन केल्याने आपणास अलौकिक अनुभूती येईल. स्वार्थी वृत्ती सोडून इतरांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
तूळ
आठवड्याच्या सुरुवातीस पहिल्या दिवशी आपणास कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कुटुंबाच्या जुन्या प्रश्नांची किंवा कार्यांची उकल करण्यात आपला बराचसा वेळ जाईल. दुसऱ्या दिवसापासून आपली भावनाशीलता आपणास कल्पना विश्वाची सहल घडवेल. प्रेमसंबंधात पुढे जाऊ शकाल. सध्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुद्धा आपण चांगला वेळ घालवू शकाल. मात्र, संबंधात आधिपत्याची भावना सोडावी लागेल. वैचारिक स्थैर्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास चिकाटीपूर्वक होऊ शकेल. भावी अभ्यासाचे सुद्धा आयोजन करण्याची किंवा एखाद्या व्यक्तीशी अर्थपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी जवाबदारी उत्तम प्रकारे पार पाडू शकतील. कामात आपला आत्मविश्वास वाढेल. नियमित प्राप्तीत वाढ करू शकाल. सध्या आपले आत्मविश्वासाचे व बौद्धिकतेचे स्तर उंचावले असल्याने नोकरी - व्यवसायात त्याचा सदुपयोग करू शकाल. कामाच्या बाबतीत आपण अधिक उत्साहित राहाल. भागीदारी कार्ये किंवा संयुक्त करार करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे. आरोग्यास पित्त प्रकोप किंवा पाउलांची जळजळ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंतचा वेळ आपण मित्र व भावंडांच्या सहवासात घालविण्यास प्राधान्य द्याल. कदाचित त्यांच्याकडून काही फायदा होण्याची किंवा भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. आपण त्यांच्यासाठी खर्च करू शकाल. त्या नंतरच्या वेळेत आपण कुटुंबास अधिक महत्व द्याल. कदाचित कामातून थोडी विश्रांती घेऊन कुटुंबातील प्रत्येकाची इच्छा किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. असे असले तरी सध्या वडीलां बरोबर असलेल्या संबंधांची काळजी घ्यावी लागेल. आपल्या वक्तव्यामुळे ते दुखावले जाण्याची शक्यता आहे. पैतृक संपत्तीशी संबंधित प्रश्न सध्या हाती घेऊ नये. आठवड्यात प्रियव्यक्तीशी संबंध चांगले राहिले तरी क्षुल्लक कारणाने आपल्यात कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. व्यतिरिक्त एकमेकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असला तरी अति घाई करण्या ऐवजी आयोजनपूर्वक अध्ययन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्यात आपले आरोग्य एकंदरीत चांगले राहील.
धनु
आठवड्यात नोकरीत आपल्या वाक्चातुर्याने इतरांचे सहकार्य मिळवू शकाल. आपली व्यापार किंवा व्यवसाय विस्ताराची योजना आकारास येऊ शकेल. गुंतवणुकी संबंधित आयोजन सुद्धा करू शकाल. आयात - निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी प्राप्तीत वृद्धी झाल्याने आपल्या हाती पैसा खेळता राहील. आपल्यासाठी स्त्रीमित्र लाभदायी ठरतील. विदेशातून स्नेहीजनांची बातमी मिळेल. ह्या आठवड्यात एखाद्या विशिष्ट हेतूने कार्य करण्यास आपण प्रेरित व्हाल. आठवड्याच्या पूर्वार्धात भविष्यात उपयोगी होऊ शकेल अशी नवी मैत्री होईल. वैवाहिक जीवनात परमोच्च आनंद उपभोगू शकाल. प्रेमात आवडत्या घटना घडू शकतील. भिन्नलिंगी मित्रांपैकीच आपण एखाद्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत ते ह्या आठवड्यात काही परीक्षात यशस्वी होऊ शकतील. उत्तरार्धात आपण अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ शकाल. आरोग्याच्या बाबतीत ज्यांना सर्दी, कफ, छातीत दुखणे किंवा श्वसनाचे विकार असतील त्यांना अधिक काळजी घ्यावी लागेल.
मकर
आठवड्याच्या सुरुवातीस आपण नकारात्मक विचार बाजूस सारून नवीन उत्साह व विचाराने वाटचाल करण्यास प्रेरित व्हाल. व्यवसायात व्यापारी भागीदारांशी धीराने वागावे. आपण कार्यात यशस्वी होण्याची शक्यता असली तरी धीर सोडू नये. विशेषतः नवीन सुरवात करताना किंवा आपल्या योजनेची अंमल बजावणी करताना आपण अति घाई केलीत तर आपल्या समोर नवीन पेच प्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे. कामात विशेषतः औषधे, छपाई, बँकिंग, शिक्षण इत्यादीत चांगल्या प्रगतीची अपेक्षा बाळगू शकता. प्रेमसंबंधात आपण पुढाकार घ्याल व आपल्यात उत्तम समन्वय सुद्धा राहील, परंतु संबंध संथ गतीने वाटचाल करत असल्याचे आपणास वाटत राहील. संबंधात जिवंतपणा आणण्यासाठी आपणास विशेष प्रयत्न सुद्धा करावे लागतील. अशा स्थितीत संबंधात अनिश्चितता वाढू शकते. विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळत नसल्याची तक्रार असेल. आरोग्याची काळजी घेण्यास आपण प्राधान्य द्यावे. प्रवासा दरम्यान दुखापत होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी.
कुंभ
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपले मन व्याकुळ झाल्याने व शरीर सुद्धा सुस्तावल्याने कामात मन रमणार नाही. प्रवासास पहिला दिवस प्रतिकूल आहे. त्या नंतर आठवडाभर घरातील सुख - शांतीच्या वातावरणात आपण वेळ घालवाल. कार्यात यश प्राप्ती झाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायी बातमी मिळेल. अचानक धनप्राप्ती तसेच आपल्यासाठी लाभदायी परिवर्तनाची शक्यता नाकारता येत नाही. प्रियव्यक्तीशी जवळीक साधू शकाल. प्रियव्यक्तीशी सलोखा व आत्मीयता राहील. मात्र, भावनाशीलतेमुळे आपली वृत्ती कदाचित पक्षपाती होऊ शकेल. काही कारणाने आपणास प्रियव्यक्तीची काळजी सुद्धा वाटू लागेल. प्रेम व्यक्त करताना सौम्य वाणी वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात चांगले लक्ष लागेल, मात्र बौद्धिक चर्चेत सहभागी होताना आपला हट्टीपणा सोडावा लागेल. पहिल्या दिवशी काही शारीरिक समस्या वगळता संपूर्ण आठवडा आपण आनंदात घालवू शकाल.
मीन
आठवड्यातील पहिल्या दिवसाच्या दुपारपर्यंत आपणास काही ना काही लाभ होण्याची शक्यता आहे. दि. २५ च्या दुपार पासून दि. २७ च्या संध्याकाळ पर्यंतचे दिवस काहीसे खर्च होण्याचे आहेत. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास उत्तरार्धात आपली आर्थिक स्थिती अधिक सुदृढ होईल. व्यावसायिक बाबतीत दि. २७ पर्यंत आपले लक्ष लागणार नाही, मात्र त्या नंतरच्या दिवसात अत्यंत उत्साहात आपण कामे करू लागाल. आपल्यात उत्साह व जोम अधिक असल्याने आपले लक्ष्यांक त्वरित गाठू शकाल. समाजात आपला मान व प्रतिष्ठा वाढीस लागेल. आठवड्याच्या मध्यास आपण स्वतःसाठी खर्च कराल. अखेरच्या दोन दिवसात प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढतीची व प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध टिकवावे लागतील. शासन किंवा कायद्या विरुद्ध कोणत्याही कार्या पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रेमसंबंधात आपला राग नियंत्रित ठेवलात तर संबंधातील परमोच्च सुखाचा आनंद घेऊ शकाल.