खेड : खासगी प्रवासी वाहनांद्वारे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची महामार्गावरील कशेडी टॅपवर अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत ७३१ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कशेडी टॅपवर १५ एप्रिलपासून प्रवाशांची अँटिजन चाचणी होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आरोग्य विभागातील ३ व तहसील
कार्यालयातील २ कर्मचारी व शिक्षक कार्यरत आहेत. गत महिन्यात ४८१ जणांची तपासणी
होऊन त्यातील १२ जण पॉझिटिव्ह आले होते. मे महिन्यात पहिल्या १५ दिवसांत १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
खेडमध्ये दोन दिवसांत १२७ कोरोनाचे नवे रुग्ण
तालुक्यात गेल्या २ दिवसांत १२७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ५७४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ हजार २९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, ४१८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत १२७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.