मंडणगड : तालुक्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत १९२० मिलिमीटर पाऊस पडला असून, पावसामुळे तालुक्यातील १७ नागरिकांची घरे व गाेठे यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० लाख ३५ हजार ८५० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालय, मंडणगड येथून प्राप्त झाली आहे.
तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वीज पडल्याने सरिता रहाटे (दुधेरे) यांच्या घरातील इलेक्ट्राॅनिक वस्तूंची नासधूस झाल्याने ४६ हजारांचे नुकसान झाले. बंधू निकम (अडखळ) यांच्या घराचे पावसाने ४७,९०० रुपयांचे नुकसान झाले. सुरेश भोसले (केळवत) यांच्या गोठा अंशत: पडझड झाल्याने ३३ हजारांचे नुकसान झाले आहे. ज्योती दिवेकर (कुंबळे) यांचे कच्चे घर पडल्याने ८१,५०० रुपयांचे नुकसान झाले. गोपाळ पवार (सावरी) यांच्या घराची अंशत: पडझड झाल्याने १५,३०० रुपयांचे नुकसान झाले. एकनाथ करवटकर (वाल्मिकीनगर) यांची दोन घरे पूर्णत: पडल्याने १ लाख ८० हजारांचे नुकसान झाले. बिलकीस मेढेकर (बाणकोट) यांच्या घराची पडझड झाल्याने ५५ हजारांचे नुकसान झाले. मंजुळा भाटकर (बाणकोट) यांच्या घराची पडझड झाल्याने २७ हजारांचे नुकसान झाले. बाळू म्हस्कर (माहू) यांच्या घराची पडझड झाल्याने २ हजारांचे नुकसान झाले.
तसेच अजित लाखण (माहू) यांच्या घराची पडझड झाल्याने २१,३०० रुपयांचे नुकसान झाले. फतिमा खल्पे (कादवण) यांच्या गोठ्याची पडझड झाल्याने २० हजारांचे नुकसान झाले. रवींद्र मोरे (तिडे) यांच्या घराची पूर्णपणे पडझड झाल्याने १ लाख २३ हजारांचे नुकसान झाले. बाबुराव भोसले (केळवत) यांच्या घराची पडझड झाल्याने १ लाख २२ हजारांचे नुकसान झाले. नंदकुमार भोसले, केळवत यांच्या घराची पडझड झाल्याने ९,८०० रुपयांचे नुकसान झाले. विजय ऐनेकर (भिंगळोली) यांच्या घराची पडझड झाल्याने १८,२५० रुपयांचे नुकसान झाले. महेश महाजन (भिंगळोली) यांच्या घराची पडझड झाल्याने १ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले. देऊ महाडिक (अडखळ) यांच्या घराची पडझड झाल्याने ७१,८०० रुपयांचे नुकसान झाले. १ जून ते १५ जुलै २०२१ या कालवधीत १० लाख ३५ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.