रत्नागिरी :
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक
संबंध ठेवून तिला गरोदर करणाऱ्या आरोपीला पाेक्सो विशेष न्यायालयाने १०
वर्षे सक्तमजुरी व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील
लांजा- शिपोशी येथे ही घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती.
समीर
शशिकांत जाधव (२१, रा. शिपोशी, लांजा, रत्नागिरी) याच्या विरोधात पीडित
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलगी कॉलेजहून घरी येत असताना संशयिताने तिचे अपहरण केले होते.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात फूस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आला होता. आरोपी समीर जाधव याची पोलीस स्थानकात चौकशी
केल्यानंतर २०१७ राेजी एका लग्नात पीडित मुलगी व आरोपी यांची ओळख झाली होती. त्यानंतर
प्रेमसंबंध जुळून आले होते. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून १६ जून २०१८ या कालावधीत तिच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याच्या गावी शिपोशी येथे
घेऊन गेला आणि मुलीशी विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले होते.
त्यानंतर
झालेल्या वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गरोदर असल्याचे पुढे आले हाेते. त्यानंतर तिच्या
वडिलांनी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास
लांजा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव करत होत्या.
तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. गुरुवारी या खटल्याचा निकाल पाेक्सो विशेष न्यायालयात झाला. या
खटल्यात सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. तर पैरवी म्हणून पोलीस
नरेश कदम यांनी मदत केली.