शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:34 PM

सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले. ​​​​​​​

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग बनला सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

विहार तेंडुलकर रत्नागिरी : सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले.मुंबई-गोवा महामार्ग हा अरुंद, वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. या चर्चेत राहणाºया कारणांमुळेच महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. २०१७या वर्षात पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेला.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांचे प्रमाण अजूनही म्हणावे तेवढे कमी झालेले नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी या महामार्गावर सरासरी एक हजार व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, ते प्रमाण आता काहीसे कमी आले आहे.मात्र महामार्गावर मद्यपान करून गाडी चालवणे, कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने वाहन हाकणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांची महामार्गावर कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही हे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सध्या पर्यटन हंगाम असल्याने त्यातच गेल्या दहा दिवसात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागत यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल होती. मात्र तरीही वर्षभरात या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात संबंधित यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.वर्ष          अपघातांची संख्या         मृत२०१३                 ११८६                २०१२०१४                 १०८४                २०५२०१५                 १०८८                १७४२०१६                १०५७                 १६३२०१७                  ८७८                १०३ 

सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणदार रस्ते, वाढती अवजड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालवणे, दुपदरी असलेल्या महामार्गावर रस्ता दुभाजकही नसणे अशा विविध कारणांमुळे हे अपघात होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग