शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

बारा हजार किलो काळा गूळ जप्त

By admin | Published: June 19, 2017 12:39 AM

दोघांना अटक; ट्रक जप्त; उत्पादन शुल्कची चिपळुणात कारवाई

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने चिपळूण तालुक्यातील उमरोली येथे रविवारी पहाटे पाठलाग करून काळ्या गुळाची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. त्यातील १२ हजार किलो काळा गूळ जप्त करण्यात आला. ट्रकचालक बलभीम देवेंद्र नायकोडी (३१, खेड, चिपळूण) व गावठी दारू बनविणारी महिला योजिता यशवंत हळदणकर (४०, रा. बोरगाव, चिपळूण) यांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक म्हणून हजर झालेल्या संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील गावठी दारूधंद्यांविरोधात मोहीम सुरू झाली आहे. विभागाच्या भरारी पथकामार्फत शनिवारी मध्यरात्रीनंतर महामार्गावर गस्त सुरू असताना उमरोली येथील एका पेट्रोल पंपासमोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकबाबत संशय आला. पथकाने पाठलाग करून ट्रक थांबवला. त्यात गावठी दारूसाठी लागणारा काळा गूळ आढळून आला. या ट्रकचा चालक नायकोडी याला याबाबत विचारले असता त्याच्याकडे गुळाच्या वाहतुकीचा परवाना नव्हता. ट्रकमध्ये प्रत्येकी २० किलोच्या ६०० ढेपा मिळून ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा १२ हजार किलो गूळ आढळून आला. अधिक तपास करता हा गूळ चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या योजिता हळदणकर हिच्याकडे तो घेऊन चालला होता. त्यामुळे हळदणकर या महिलेलाही अटक करण्यात आली. गुळाबरोबरच ट्रकही (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ८७३९) जप्त करण्यात आला आहे. याशिवाय हळदणकरच्या घरावर छापा टाकला असता तेथे प्रत्येकी २०० लीटरचे गूळ, नवसागर रसायनाने भरलेले १० प्लास्टिक बॅरल्स व गावठी दारूने भरलेले प्रत्येकी २० लीटरचे दोन कॅन व भट्टीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. हा एकूण ४६,८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड, खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक महेश शेंडे, चिपळुणचे प्रभारी निरीक्षकएन. एम. शेख, सहायक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर तसेच जवान वैभव सोनावले, निनाद सुर्वे, विशाल विचारे, अतुल वसावे, राजेंद्र भालेकर, संदीप विटेकर, अर्शद शेख, सावळाराम वड, महिला कॉन्स्टेबल अनिता नागरगोजे उर्फ डोंगरे सहभागी झाले होते.