रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १२५ नव्या रुग्णांची भर पडली असून पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ११८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७६,४५७ इतकी झाली असून २३६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ७२,८५३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६ लाख ८२ हजार ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात १२५ कोरोनाबाधित सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या ९६, तर अँटिजन चाचणीत २९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. ४१०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाचजणांचे मृत्यू नोंदविण्यात आले असून यापूर्वीचे ३ आणि सोमवारचे दोन मृत्यू यांचा समावेश आहे.
आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ७६,४५७, तर अबाधितांची संख्या ६ लाख ८२ हजार ६६ इतकी आहे. आतापर्यंत ७२,८५३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९७३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ३१७, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ६५६ इतकी आहे. यापृकी गृह अलगीकरणात ४९१ जण असून संस्थात्मक विलगीकरणात ४८२ रुग्ण आहेत.