राजापूर : तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १२६ अंडी सापडली आहेत. वनविभागाने स्थानिकांच्या साथीने त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेत्येवासियांना कासवांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.तालुक्याच्या किनारपट्टीवर विविध प्राणी, प्रक्ष्यांसह जलचर प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामध्ये आता ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचा वावर असल्याचे गेल्या काही वर्षामध्ये स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारची ऑलिव्ह रिडले कासवाची तब्बल १२६ हून अधिक अंडी वेत्ये किनारपट्टीवर आढळली आहेत.वनपाल राजश्री किर, स्थानिक कासवमित्र शामसुंदर गवाणकर, गोकुळ जाधव आदींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या अंड्याचे सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. या अंड्यांमधून सुमारे ५३ ते ५५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर येऊन पुढील जीवनप्रवासासाठी समुद्राकडे झेपावणार आहेत.
वेत्ये येथे कासवे समुद्रात झेपावली, १२६ अंडी सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 5:00 PM
राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १२६ अंडी सापडली आहेत. वनविभागाने स्थानिकांच्या साथीने त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेत्येवासियांना कासवांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.
ठळक मुद्देवेत्ये येथे कासवे समुद्रात झेपावली, १२६ अंडी सापडली ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचा वावर