रत्नागिरी : चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी दहशतवाद विराेधी शाखेने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील कालरकाेंडवाडी येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.वहीद रियाज सरदार (३५, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा, कलारोवा), रिजाऊल हुसेन करीकर (५०, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), शरीफुल हौजीआर सरदार (२८, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (५०, रा. तहसील कैबा, जि. जसोर), हमीद मुस्तफा मुल्ला (४५, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), राजू अहमद हजरतअली शेख (३१, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), बाकीबिल्लाह अमीर हुसेन सरदार (२९, रा. तहसील कलारोवा, जि. सान कलारोवा),
सैदूर रेहमान मोबारक अली (३४, रा. पसल कलारोवा, जि. सातखिरा), आलमगीर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४, रा. पाईकपरा, पो. कामाराली, जि. साथखिरा), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (३२, रा. बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८, रा. बाशबरी, जि. जसोर), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५, रा. बराली, जि. सातखिरा), मोहम्मद लालटू मोंडल, सन ऑफ किताब अली (३७, रा. बराली, जि. सातखिरा), अशी अटक केलेल्या नागरिकांची नावे आहेत.पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलिस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही कामगिरी केली आहे.