शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

१३ कोटी १७ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Published: March 22, 2016 12:24 AM

जिल्हा परिषद : शिक्षण विभागासाठी तब्बल ७१ लाखांची तरतूद

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १३ कोटी १७ लाख १८ हजार ४२४ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक आज सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. त्याचवेळी सन २०१५-१६चे २६ कोटी ३४ लाख ४८ हजार ९८९ रुपयेचे अंतिम सुधारित अंदाजपत्रकही सभागृहात मंजूर झाले. ही सभा अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवारी) झाली. या सभेत वित्त समिती सभापती विलास चाळके यांनी हे अंदाजकपत्रक मांडले. त्यानंतर सभागृहात विविध मुद्यांवर झालेल्या चर्चेने या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.दि. १ एप्रिल २०१५ रोजी मूळ अंदाजपत्रकात दाखवलेली शिल्लक ८१८५१ रुपये असली, तरी प्रत्यक्ष झालेली जमा व केलेला खर्च यांचा मेळ घातल्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी आरंभीची शिल्लक ११ कोटी १३ लाख १५ हजार ४७६ रुपये एवढी राहिली. सन २०१५-१६साठी सुधारित अंदाजपत्रकात केलेली सुधारित जमेची तरतूद रुपये १५ कोटी २१ लाख २८ हजार ५१३ एवढी आहे. तर २०१५-१६ ची एकूण अंतिम सुधारित महसूली जमा रुपये २६ कोटी ३४ लाख ४८ हजार ९८९ व २०१६-१७चे मूळ अंदाजपत्रक रुपये १३ कोटी १७ लाख १८ हजार ४२४ इतके आहे. सन २०१६-१७च्या मूळ अंदाजपत्रकात २ कोटी ३ लाख २० हजार २०० रुपये समाजकल्याण विभागासाठी देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा व देखभाल निधीसाठी या अंदाजपत्रकात २ कोटी ४ लाख ३६ हजार ९२० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी १ कोटी १ लाख ६० हजार १०० रुपये, अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता ३९ लाख ५१ हजार ५५३ रुपये, एक अध्यक्ष या लेखाशिर्षासाठी मूळ अंदाजपत्रकात ९१ लाख ९६ हजार २०० रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागांसाठी करण्यात आलेली तरतूद याप्रमाणे - शिक्षण विभाग - रुपये ७१ लाख, बांधकाम विभाग - रुपये १ कोटी ५० लाख, पाटबंधारे विभाग - रुपये ५० हजार, आरोग्य विभाग - रुपये ७ लाख २० हजार, सार्वजनिक आरोग्य - रुपये ३० लाख, ग्रामपंचायत पाणीपुरवठा - रुपये २ कोटी ५४ लाख ४६ हजार ९२०, शेती विभाग - रुपये ६० लाख, पशुसंवर्धन - रुपये ५० लाख ३७ हजार ८३०, जंगले - रुपये ३ लाख, समाजकल्याण विभाग - रुपये २ कोटी ३ लाख २० हजार २००, अपंग कल्याण - रुपये ३९ लाख ५१ हजार ५५३, सामुहिक विकास - रुपये ६० लाख, ऊर्र्जा विकास - रुपये ५ लाख, निवृत्ती वेतने - रुपये १८ लाख, संकीर्ण - रुपये ७६ लाख ३६ हजार ६८१ एवढी मूळ अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पुसावळे, उपाध्यक्ष सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, सदस्य उदय बने, अजय बिरवटकर, विश्वास सुर्वे, सदस्या रचना महाडिक, नेहा माने व अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)सर्वाधिक तरतूद: समाजकल्याणसाठी २ कोटी ३ लाखविविध विभागांसाठी मूळ अंदाजपत्रकातील तरतूद (२०१६-१७)शिक्षण विभाग - रुपये ७१ लाखबांधकाम विभाग - रुपये १ कोटी ५० लाखपाटबंधारे विभाग - रुपये ५० हजारआरोग्य विभाग - रुपये ७ लाख २० हजारसार्वजनिक आरोग्य - रुपये ३० लाखग्रामपंचायत पाणीपुरवठा - २ कोटी ५४ लाख ४६ हजार ९२०शेती विभाग - रुपये ६० लाखपशुसंवर्धन - रुपये ५० लाख ३७ हजार ८३०जंगले- रुपये ३ लाखसमाजकल्याण विभाग - २ कोटी ३ लाख २० हजार २००अपंग कल्याण - रुपये ३९ लाख ५१ हजार ५५३सामुहिक विकास - रुपये ६० लाखऊर्जा विकास - रुपये ५ लाखनिवृत्ती वेतन - रुपये १८ लाखसंकीर्ण - रुपये ७६ लाख ३६ हजार ६८१अध्यक्ष, सभापती गोंधळले...जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मांडल्यानंतर सभेच्या विषयपत्रिकेवर आणखी चार विषय शिल्लक होते. माजी अध्यक्ष जगदीश राजापकर बाहेर निघून गेल्याने सभा संपली असा अध्यक्ष गोलमडे यांचा समज झाला. गोंधळलेल्या स्थितीत त्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. चार विषयांवर निर्णयच न झाल्याने आक्षेप घेत राष्ट्रवादीने गोंधळ घातला. त्यानंतर झालेली चूक कबूल करत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याचे गोलमडे व चाळके यांनी सांगितले.