खेड : तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या मौजे जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत होता. पाण्याची समस्या आमदार योगेश कदम यांच्याकडे गोपीनाथ मोरे यांनी मांडल्यानंतर त्यांनी या गावाच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य देत, या गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जादाचा निधीही आपण आमदार फंडातून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
गावाच्या नळपाणी योजनेसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आमदार योगेश कदम हे मौजे जैतापूर गावाचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख श्रीकांत शिर्के यांनी दिली. या गावाच्या विकास कामासाठी गोपीनाथ मोरेंसह आप्पा मोरे, बबन मोरे, माजी सरपंच बांद्रे व ग्रामस्थ यांनी पाठपुरावा केला होता.
यावेळी घेरासुमारगड शिंदेवाडीच्या पाणीप्रश्नासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती माजी सरपंच गोपीनाथ मोरे यांनी दिली.