शोभना कांबळेरत्नागिरी : लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.अजूनही नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे लोकशाही प्रणाली यशस्वीपणे राबवताना अनेक अडचणी येत आहेत. अजूनही मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग १०० टक्के नाही. त्यामुळे पात्र उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे सर्वच निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये त्याचबरोबर नवमतदारांमध्ये जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निवडणूक साक्षरता क्लब तयार करण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८पासून सुरू झाली आहे.विद्यार्थीदशेत या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक कार्यपद्धती याबाबत जागृती होत राहिल्याने हे विद्यार्थी १८ वर्षांचे झाल्यानंतर ते आपोआपच सुजाण नागरिक होणार आहेत. यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक साक्षरता क्लब शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू रहाणार आहे. याकरिता दिल्ली येथील निवडणूक कार्यालयाकडून कार्यालयीन निधी तसेच याबाबतचे साहित्य जिल्हास्तरावर लवकरच उपलब्ध होणार आहे.
तसेच येथील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून ते कर्मचारी इथ आल्यानंतर प्रशिक्षण घेणार आहेत. हे साक्षरता क्लब लोकशाही प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणार असून लोकशाही कशी बळकट होणे आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेले निवडणूक साक्षरता क्लबशाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तर : १८७नव मतदार (वरिष्ठ महाविद्यालय स्तर) : ६५मतदान केंद्र स्तरावर : १२०२तसेच मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये ८३ क्लब स्थापन करण्यात आले असून, ही प्रक्रिया यापुढेही विविध शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांमध्ये सुरू रहाणार आहे.