रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीच्या २४ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता चार मतदार संघातील पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम १९९९ अन्वये जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरीतील निवडणुकीने भरावयाच्या २४ पदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. २४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ९ उमेदवार रिंगणात आहेत.
४५पैकी १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, १७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता चार मतदार संघातील पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
निवडणूक लढवणाºया उमेदवारांची अंतिम यादी आज प्रसिध्द करण्यात आली असून, गुरुवार १० आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.संक्रमाणात्मक क्षेत्र मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण तीन उमेदवार होते. यापैकी रवींद्र कांबळे यांनी अर्ज मागे घेतला असून, खालीद रखांगे (काळकाई कोंड, दापोली), नंददीप बोरूकर (देवरूख) हे निवडणूक रिंगणात आहेत.