लाजा : शहरातील एकाच कुटुंबातील १५ व शहरातील इतर ६ तर वेरवली येथील एकजण असे मंगळवारी एका दिवसामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना कालावधीत आतापर्यंतच्या आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मंगळवारच्या एका दिवसातील रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी आली आहे.
महसूल विभागात मंडल अधिकारी व त्यांचा भाऊ व पुतण्या यांची सोमवारी करण्यात आलेल्या अॅन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या घरातील १८ सदस्यांशी अॅन्टिजेन चाचणी करण्यात आली होती.
यामध्ये १८ सदस्यांपैकी १५ सदस्यांची अॅन्टिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच शहरातील एका दाम्पत्याची अॅन्टिजेन चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. तसेच वेरवली येथील एक अॅन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी अॅन्टिजेन चाचणीत शहरातील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील ४ जणांचे आरटीपीसीआर कोरोना स्टेटचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. मंगळवारी एका दिवसामध्ये लांजा शहरातील २१ व वेरवली येथील एक असे एकूण २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.