रत्नागिरी : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यात २३ सरकारी रुग्णालये आणि ७ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयामध्ये २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात १६ जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी, १ मार्चपासून दुसरा टप्पा सुरु करण्यात येत आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिक हे लस घेऊ शकतात.
लसीच्या एका डोसचे २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. खासगी रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारु शकत नाहीत. त्याबाबतची सूचना प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोना लस देण्याच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदिंना ही लस देण्यात आली होती. त्यावेळी डोस घेतल्यानंतर काहींना त्रासही झाला होता. त्यातील काहींनी दुसरा डोसही घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यासाठी आरोग्य विभागाने नोंदणीचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत २२,३३८ जणांनी त्यासाठी नोंदणी केली आहे.नोंदणी कशी करणार?कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद आरोग विभाग आणि जिल्हा शासकीय आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
पहिल्या टप्प्यातील लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी कोविड डॅश बोर्ड, आरोग्य सेतू या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन इच्छुक नोंदणी करीत आहेत.कोणाला मिळणार लसकोरोना लस कोणाकोणाला देता येईल हे शासनाने निश्चित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून लस देण्याचे काम सुरु होत आहे. त्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.पहिल्या टप्प्यातील दहा हजार बाकीपहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा, महसूलचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना लस देण्यात आली. त्यामध्ये पहिला डोस १४,८२७ जणांनी घेतला. त्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी देण्यात आला. दुसरा डोस ३२०४ जणांनी घेतला आहे. उर्वरित जणांना लवकरच हा डोस देण्यात येणार आहे.सरकारी रुग्णालये१) जिल्हा शासकीय रुग्णालय२) कोकणनगर न. प. रुग्णालय३) झाडगाव न. प. रुग्णालय४) हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र५) चिपळूण न. प. रुग्णालय६) कामथे उपजिल्हा रुग्णालय७) अडरे प्राथमिक आरोग्य केंद्र८) खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र९) कळंबणी उपजिल्हा रुग्णालय१०) राजापूर ग्रामीण रुग्णालय११) धारतळे प्राथमिक आरोग्य केंंद्र१२) ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र१३) जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र१४) मंडणगड ग्रामीण रुग्णालय१५) गुहागर ग्रामीण रुग्णालय१६) आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र१७) तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र१८) दापोली उपजिल्हा रुग्णालय१९) आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र२०) साखळोली प्राथमिक आ. केंद्र२१) संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय२२) साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र२३) लांजा ग्रामीण रुग्णालयखासगी रुग्णालये१) श्री रामनाथ हॉस्पिटल, रत्नागिरी२) परकार हॉस्पिटल, रत्नागिरी३) एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण४) वालावलकर हॉस्पिटल, चिपळूण५) दिनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल, लांजा६) लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण