शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

‘तेजस’च्या २६ प्रवाशांना आम्लेटमधून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : सहा महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेमध्ये रविवारी अन्नामधून २४ प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते.या घटनेची माहिती मिळताच ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : सहा महिन्यांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेमध्ये रविवारी अन्नामधून २४ प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते.या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाबाबत माहिती घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणानंतर कामथे रेल्वे स्थानकामध्ये दादर पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती.कोकण रेल्वे मार्गावरील करमाळी (गोवा) येथून तेजस एक्स्प्रेस रविवारी दुपारी १.१५ वाजता सुटली. दुपारी ३.१५ च्या दरम्यान ती चिपळूण येथील वालोपे रेल्वे स्थानक येथे दाखल झाली. तत्पूर्वी रत्नागिरी स्थानकाच्यापुढे या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना उलटीचा त्रास जाणवू लागल्याचे या ठिकाणी कार्यरत असणाºया तिकीट तपासनिसाच्या निदर्शनास आले. ही विषबाधा कटलेट, आम्लेट व ब्रेड या अन्नपदार्थांतून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दुपारी १.४५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानकाला दूरध्वनी केल्यानंतर ही रेल्वे चिपळुणात थांबवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही गाडी सुमारे दीड तास थांबविण्यात आली.तेजस एक्स्प्रेसमधील घटना समजताच चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, उपसभापती शरद शिगवण, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेऊन विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी मदतकार्य केले. त्यानंतर विषबाधा झालेल्या २४ प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये हरीश तोवर, साची नायक, मिनाज मोमीन, शोमिता डे, आदिती सावर्डेकर, विनेश कुमार, अरुण भाटिया, प्रणम कुमार, रणधीर नागवेकर, राहुल मंडल, संजय पत्र, सौरभ उबाळे, मार्टिन फर्नांडिस, शैतुन पत्रो, रईस मोमीन, सुशांत नाहक, नोमिता तिर्की, निहारिका जाधव, मोसेज डिसुजा, आरती शहा, रोहित टॅग, आशिका कुमार, नीलेश जाधव, आरव तोमर यांचा समावेश आहे. यापैकी चारजणांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात दाखल प्रवाशांबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून एसआरपी ग्रुप, ट्रॅकिंग फोर्स, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले....म्हणे आधुनिक सुखसोयींची गाडी!गोव्यातील करमाळी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाºया तेजस एक्स्प्रेसचे, आधुनिक सुखसोयी असलेली सेमी हाय स्पीड गाडी म्हणून मोठा गाजावाजा करून जूनमध्ये उद््घाटन केले गेले होते. स्वचलित दरवाजे, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग पॉर्इंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती व्यवस्था, सेलिब्रिटी शेफ मेन्यू आणि कॉफी व्हेंडिंग मशीन या सोयींची मोठी प्रसिद्धी केली गेली होती.