राजापूर (जि. रत्नागिरी) : मनाई आदेशाचा भंग करत जमाव जमवल्याबद्दल राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यावर गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. साळवी यांच्यासोबत शिवसेनेचे पंचायत समिती सभापती आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते अशा ३० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सण, रिफायनरी प्रकल्पाबाबतची आंदोलने आणि नगर पंचायत निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यात २ एप्रिल ते १६ एप्रिल या काळासाठी जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केला आहे. गुरुवारी या मनाई आदेशाचे उल्लंघन करून शिवसेनेने राजापुरात आंदोलन केले. रिफायनरी प्रकल्पासाठी सौदीच्या कंपनीशी बुधवारी सरकारने करार केला. त्याचा निषेध करण्यासाठी आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली राजापुरातील शिवसैनिकांनी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. मनाई आदेश असतानाही जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
राजन साळवी यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 4:36 AM