शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Ratnagiri: बारसू रिफायनरीजवळील ३०० एकर जमीन औद्योगिक क्षेत्र घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 11:55 AM

राजापूर : महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केली ...

राजापूर : महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहे. ही जमीन प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या जागेपासून ५ किलाेमीटर अंतरावर आहे, ज्याला गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.राज्य सरकारने काढलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, वाडी खुर्द गावातील विशिष्ट क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर बारसू गाव आहे. त्याच तालुक्यात, जिथे रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड, २०१७ मध्ये स्थापन झालेली आणि सरकारी मालकीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बीपीसीएल लि. आणि एचपीसीएल लि. यांच्या संयुक्त मालकीची कंपनी आहे. बहु-अब्ज डॉलरचा रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी स्थापन करण्यात आला.सुरुवातीला, हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावात प्रस्तावित करण्यात आला होता; परंतु स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकारने १२ जानेवारी २०२२ मध्ये केंद्राला पत्र लिहून बारसूमध्ये १३,००० एकर जमीन संपादित केली जाईल, असे कळवले होते.

परंतु २०२३ च्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या विरोधानंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम रखडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बारसूमध्ये सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम सुरू केले.प्रकल्पाला विरोध करताना, बारसू-सोलगाव आणि कोकणातील शेजारच्या गावातील ग्रामस्थांनी पर्यावरणावर आणि स्थानिक समुदायांच्या जीवनमानावर संभाव्य परिणाम सांगितले आहेत. जे मुख्यतः आंब्याच्या बागांची लागवड, तसेच फणस आणि काजू लागवड आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत.२०१९ मध्ये महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने बारसू, सोलगाव आणि इतर गावांचा काही भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. त्यानंतर आता पुन्हा राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील ३०० एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प