मेहरून नाकाडेरत्नागिरी : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळ कार्यरत असून, प्रवाशांच्या गर्दीतही चालक, वाहक सेवा देत आहेत. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असला तरी चालक, वाहक, तसेच वाहक कम चालक मिळून एकूण ३,०९१ कर्मचारी दररोज ३,३५९ फेऱ्यांद्वारे एक लाख ३९ हजार ८५५ प्रवाशांची वाहतूक करत असल्याने प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत.लॉकडाऊननंतर एस. टी.ची वाहतूक हळूहळू रूळावर येत असतानाच पुन्हा कोरोना रुग्णवाढीचे संकट उभे राहिले आहे. आधीच तोट्यात असलेल्या एस. टी.ला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने एस. टी. वाहतूक सुरू आहे. प्रवाशांच्या गर्दीत वाहक, वाहक कम चालक यांना वावरावे लागत आहे. तिकिटासाठी प्रवाशांशी संपर्क येत असला तरी वाहक, वाहक कम चालक आरोग्याची काळजी घेत आहेत. मास्कचा वापर केला जात असून, सॅनिटायझरचाही वापर सुरू आहे.शाळा, उद्योग-व्यवसाय, खासगी तसेच सरकारी आस्थापना सुरू आहेत. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागातील गाड्या प्रवाशांनी भरून धावत आहेत. काही मार्गावरील गाड्या तर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. प्रवाशांच्या गर्दीत वाहकाला तिकीट काढण्यासाठी वावरताना, प्रत्येक प्रवाशांशी संपर्क येतो. तिकीट, पैशांची देवाण-घेवाण होते. आरोग्याची काळजी घेत असताना सॅनिटायझर खिशात बाळगावेच लागते. सातत्याने सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवावे लागत आहेत.एस. टी.चे चालक, वाहक ड्युटी संपवून घरी जात असतानाच त्यांना स्वत:बरोबर कुटुंबीयांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कोरोनाचे संकट असतानाही, प्रवासी वाहतुकीसाठी चालक, वाहक कर्तव्य बजावत असल्याने त्यांना विमा कवच उपलब्ध होणे आवश्यक आहे.प्रवाशांचा रोज प्रवासरत्नागिरी विभागातील नऊ आगारांमध्ये ५७८ एस. टी.द्वारे ३३५९ फेऱ्या सुरू असून, एक लाख ३९ हजार ८५५ प्रवाशांची दैनंदिन वाहतूक करण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी वाहतुकीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गर्दीत वाहकांना वावरावे लागत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडत आहे.तपासणीच नाहीबेस्ट वाहतुकीसाठी रत्नागिरीतून मुंबईमध्ये गेलेल्या चालक वाहकांची कोरोना तपासणी करण्यात येत होती. काही चालक-वाहक, कर्मचाऱ्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली होती. मात्र, महामंडळ, अथवा शासनातर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी कोरोना तपासणीसाठी कोणतीच व्यवस्था अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही.
प्रवाशांची वाहतूक करणे हे आमचे कर्तव्य आहे. शासनाचे आदेश येईपर्यंत आमची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. सुरुवातीला आम्हाला सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून दिले होते. मात्र, आता आम्ही स्वत:च खरेदी करीत आहोत, त्यामुळे महामंडळाने उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.- संतोष शेट्ये, वाहक
कोरोनामुळे प्रत्येक फेरीनंतर गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. ही व्यवस्था कायम ठेवणे गरजेचे आहे, तरच कोरोना संसर्ग रोखण्यास काहीअंशी हातभार लागेल. एस. टी.चे प्रत्येक कर्मचारी कोरोना योद्धे असून, त्यांना ह्यआरोग्य कवचह्ण उपलब्ध होणे आवश्यक आहे.- मंगेश देसाई, चालक
प्रवाशांशी सातत्याने संपर्क येत असल्याने वाहक, चालकांना आरोग्याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. बसस्थानक, बसेस, कार्यालयात सॅनिटायझर उपलब्धता करण्यात आली असून, मास्क वापर सक्तीचा केला आहे. गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक