शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 11:46 AM

विम्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी, गतवर्षीपेक्षा दोन हजार शेतकरी वाढले

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे गेली काही वर्षे आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच येत आहे. महागडी कीटकनाशके आणि खते वापरूनही हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. अशावेळी फळपीक विमा योजनेमुळे नुकसानाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेतील सहभाग वाढत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. जिल्ह्यातील एकूण ३० हजार २५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिल्याने नोंदणीसाठी दि. ४ व ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकरी सहभाग वाढला असून, आता सहभागी शेतकऱ्यांची संख्या एकूण ३४ हजार ६०५ इतकी झाली आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

  • आंबा पिकाचे शेतकरी - २८२६२
  • काजू पिकाचे शेतकरी - ६३४३
  • एकूण शेतकरी - ३४६०५
  • कर्जदार शेतकरी - २८४९९
  • बिगर कर्जदार - ६१०६ 
  • आंबा पिकाचे क्षेत्र - १५६४६.८८ (हेक्टर)
  • काजू पिकाचे क्षेत्र - ३९४५.८ (हेक्टर)
  • एकूण क्षेत्र - १९५९२.६८ (हेक्टर)

 

  • शेतकरी विमा हप्ता - २२७४४३१९३.१
  • विमा संरक्षित रक्कम - २५८०७३९०४०

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकरीतालुका - शेतकरी - क्षेत्रमंडणगड -३८९७ - १९०३.४१दापोली - २८२४ - १३७२.२८खेड - ३१४५ - १५५९.७चिपळूण - ३१८९ - १८७०.९गुहागर - १६९५ - ८९४.६५संगमेश्वर - ६६४३ - ३२८०.५५रत्नागिरी - ३४६४ - २५७६.०७लांजा - ३८५४ - ३०४४.७५राजापूर - ५८९४ - ३०९०.३७एकूण - ३४६०५ - १९५९२.६८

फळपीक विमा योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुक असूनही अनेक शेतकरी सहभागापासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे सहभागासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी