शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कोकण रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’

By admin | Published: May 24, 2016 1:29 AM

संजय गुप्ता : धोकादायक कड्याला रेड सेन्सर बसविणार; ११ नवी स्थानके मंजूर

सिंधुदुर्गनगरी : कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणारी ३६ ठिकाणे ‘डेंजर झोन’ म्हणून जाहीर केली आहेत. म्हणूनच पावसाळ्यात कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने ९५० सुरक्षा कर्मचारी या धोकादायक ठिकाणी २४ तास पहारा देणार आहेत. तसेच धोकादायक कड्याच्या बाजूला ‘रेड सेन्सर’सारखी अद्ययावत यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निर्धोकपणे प्रवास करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे महाप्रबंधक संजय गुप्ता यांनी दिली. तसेच कोकण रेल्वे मार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने केलेली पूर्वतयारी व प्रवाशांसाठी देण्यात येत असलेल्या सुविधांबाबतची माहिती देण्यासाठी कोकण रेल्वेने सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथ पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बी. बी. निकम, उपप्रबंधक सिद्धेश्वर तेलुगु, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, सुनिल नारकर आदी अधिकारी उपस्थित होते.यंदा सरासरीच्या ३० टक्के जास्त पावसाची जास्न शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे तीन ठिकाणी कंट्रोल रुम, वेर्णा व रत्नागिरी येथे मेडिकल व्हॅन सज्ज ठेवण्यात आलेली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील केल्या गेलेल्या उपाययोजनांचे निरीक्षण रेल्वे सेफ्टी बोर्डाच्या कमिशनरनी केले असून त्यांनी सुचविलेल्या काही सूचनांची अंमलबजावणी ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.११ नवीन स्थानकेकोकण रेल्वे मार्गावर वाढलेली रहदारी पाहता रेल्वे स्थानकांची संख्या वाढविणे गरजेचे होते. हे पाहता कोकण रेल्वे मार्गावर ११ नवीन स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये सिंधुदुर्गातील खारेपाटण व आचिर्णे, रत्नागिरीतील वेरावली, पोमेंडी, काडवाई, कळंबोली, रायगडमधील इंदापूर, गोरेगाव रोड व सापे बाम्हणे या स्टेशनचा समावेश आहे. तर कर्नाटकमधील मिरजान व इंजानी यांचा समावेश आहे.स्टेशन कोटा यापुढे रद्द होणारप्रत्येक रेल्वे स्टेशनला आतापर्यंत स्वतंत्र कोटा ठेवण्यात आलेला होता. मात्र यापुढे तो कोटाच रद्द करण्याचे आदेश भारतीय रेल्वेने दिले आहेत. तसेच ज्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म अर्धवट स्थितीत आहेत अशा ठिकाणी निळ्या रंगाचे शटर बसविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.२५ मे रोजी रेल्वे हमसफर सप्ताहया सरकारला २५ मे रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने २५ मे पासून रेल्वे हमसफर सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यावेळी दोन वर्षात कोकण रेल्वेने केलेल्या सर्व कामांची माहिती दिली जाणार आहे.दुसरी कोकणकन्या सुरु करण्याचा विचारकोकण रेल्वेला प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद व ओघ पाहता कोकणकन्या एक्स्प्रेस-२ सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासन करत आहे. (प्रतिनिधी)१५ दिवसांत सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटनकणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीनही स्टेशनचे अद्ययावतीकरण प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत सावंतवाडीतील पहिल्या टप्प्यातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, प्लॅटफॉर्मची शेड करणे सुरु आहे तर, टर्मिनसच्या दृष्टीने बिल्डिंग, तिकीट घर व रेल्वे वॉशिंग प्लँटचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १५ दिवसांत या टर्मिनसचे उद्घाटन करण्यात येईल. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ येथे गर्दीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होऊ नये व आरक्षित तिकिटे तत्काळ मिळावीत यासाठी जेडीबीएस सेवा स्टेशनजीकच सुरु करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.हे आहेत आपत्कालीन ‘टोल फ्री’ नंबररेल्वेविषयक विविध माहितीसाठी १८००२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांना रेल्वेच्या आवागमनाची पूर्ण माहिती मिळू शकते. रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांना काही समस्या असल्या तर त्यांनी १८२ या नंबरवर संपर्क किंवा एसएमएस करायचा आहे. तर रेल्वेविषयक खानपान व अन्य तांत्रिक तक्रारीसाठी ९००४४७०७०० या नंबरवर एसएमएस करावयाचा असल्याचेही प्रबंधक संजय गुप्ता यांनी सांगितले.