दापोली : कोरोनाशी लढतानाच दापोलीत पाच पोलीस कुटुंबांतील ४0 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोना लढ्यात मोठे काम करणाऱ्या पोलिसांबाबतच्या या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.दापोलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे दापोली शहरात डेंग्यू या आजाराने शिरकाव केला आहे. पोलीस वसाहतीतील पाच कुटुंबातील व्यक्तिंना डेंग्यूची लागण झाली आहेदापोलीतील काही भागांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगर पंचायतीने शहरातील काही भागांची पाहणी करून फवारणी केली आहे. या भागात डेंग्युसदृश अळ्या आहेत का, याची पाहणी करण्यात आली.
मच्छीमार्केट व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. कोरोनाच्या रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करत नसल्याची खंत दापोली नगर पंचायतीचे आरोग्य सभापती मंगेश राजपूरकर यांनी व्यक्त केली आहे.