लांजा : शहराबरोबरच ग्रामीण भागामध्येही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे. मंगळवारी तालुक्यात ४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत, तर दोन दिवसांमध्ये दोघांचा बळी गेला आहे.
एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढायला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले. मंगळवारी करण्यात आलेल्या ॲन्टिजेन कोरोना चाचणीत २२ तर आरटीपीसीआर चाचणीत १८ असे एकूण ४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांमध्ये कोरोनाने दोघांचे बळी घेतले आहेत.
तालुक्यातील मठ कडूवाडी येथे १, रुग्ण पराडकरवाडी येथे ७, सडवली येथे ३, रुग्ण गोंधवलीत २, लांजा बौद्ध वाडीत २, लांजा रेस्टहाउस येथे २, लांजा नाईकवाडीत ३, लांजा कुरुपवाडीत ३, विवली तेलीवाडीत १, गवाणे कर्नवलेवाडीत २, पुनस गुरववाडीत १, विवली खांबडवाडीत २, रुग्ण मठवाडीत २, हर्दखळे बौद्धवाडीत ३, प्रभानवल्ली, खावडी पिलकेवाडी, लांजा खावडकरवाडी, धुंदरे सुतारवाडी, मठ बौद्धवाडी, झापडे ब्राह्मणवाडी येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. सध्या तालुक्यात ३५३ सक्रिय रुग्ण आहेत.