रत्नागिरी , 5 : परतीच्या पावसाने घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत ४३ घरांची पडझड झाली.
११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर पाच जनावरे मृत झाली.
परतीच्या पावसाने जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले. ३० सप्टेंबरपासून मेघगर्जनेसह सलग चार पडणाºया पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
या चार दिवसांत ४३ घरांची पडझड झाली. ११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर चार जनावरे मृत झाली. या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.