रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह ४३० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६३,९८२ झाली आहे. ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, एकूण ५६,०५१ रुग्ण बरे झाले. कोरोनाने ७ रुग्णांचा बळी गेला असून, मृत्यूची संख्या १,८१७ झाली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर ७.२१ टक्के आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ४,७७१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १९२ रुग्ण तर अँटिजन चाचणीत १५२ रुग्ण असून, एकूण ३४४ रुग्ण सापडले. त्यामध्ये मागील ८६ रुग्ण आहेत. मंडणगड तालुक्यात केवळ १ रुग्ण सापडला असून, दापोलीत ५, खेडमध्ये ३२, गुहागरात ३०, चिपळुणात ९५, संगमेश्वरात ५३, रत्नागिरीत ७८, लांजात १९ आणि राजापुरातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, चिपळूण या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ तर संगमेश्वरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेले सर्व रुग्ण महिला आहेत. शासकीय रुग्णालयात ५ तर खासगी रुग्णालयात २ रुग्ण मृत्यू पावले. कोरोनाबाधित मृतांचा दर २.८४ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८७.६० टक्के आहे.