शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

रत्नागिरीतील पोलिस भरतीत १३१ पदांसाठी ४,८४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 6:15 PM

प्रत्येक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंग व्यवस्था ठेवण्यात आली होती

रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई पदाच्या भरतीत १३१ पदांसाठी ४,८४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत. या पदासाठी एकूण ७,६९६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.रत्नागिरीत २०२१मधील पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया २ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत पार पडली. १३१ पदांसाठी झालेल्या या भरतीसाठी ७,६९६ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५,५३२ उमेदवार शारीरिक चाचणीकरिता हजर झाले. यातील ६८९ उमेदवार अपात्र ठरल्याने मैदानी चाचणीसाठी ४,८४३ उमेदवार पात्र ठरले आहेत.

ही भरती प्रक्रिया पारदर्शक तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाद्वारे प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्याद्वारे भरती प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंग व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड मार्गदर्शन करत होते.पोलिस भरतीतील उमेदवारांकडून प्रत्येक गुणपत्रकावर स्वाक्षरी घेण्यात येत होती. उमेदवारांसाठी ठिकठिकाणी माहिती फलकही लावण्यात आले होते. विविध शासकीय विभागांनी आणि विविध सेवाभावी संस्थांनी शारीरिक चाचणीदरम्यान पोलिस दलाला सहकार्य केले. या भरती प्रक्रियेत कोठेही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार घडल्याचे समोर आलेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस