शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
5
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
6
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
7
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
8
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
9
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
10
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
11
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
12
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
13
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
15
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
16
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
17
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
18
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
19
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
20
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यांत १४० अपघातात ४९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 1:04 PM

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत ...

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ जीवघेण्या अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३९ गंभीर अपघातांमध्ये ९१ गंभीर झाले आहेत. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण गेल्याने किंवा झोप अनावर झाल्याने होतात. वाहनचालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे, महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे गतवर्षापासून अपघातांची संख्या घटली आहे.मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अति वेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, या प्रमुख कारणांमुळे अपघात होत असतात. जानेवारी ते एप्रिल २०२४ या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४० अपघात झाले. या अपघातांमध्ये ४८ जीवघेणे,९१ गंभीर आणि ८३ किरकोळ तर २० विना जखमी अपघातांचा समावेश आहे.४९ ठार, ९१ जखमीगेल्या ४ महिन्यात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ अपघातांमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अपघातांमध्ये ९१ गंभीर तर ८३ किरकोळ जखमी झाले.

चार महिन्यांतील अपघातांची आकडेवारी अशी :

  • एकूण अपघात : १४० - मृत्यू ४९ जखमी : १७४            
  • जीवघेणे अपघात : ४८, मृत्यू : ४९
  • गंभीर अपघात : ३९, जखमी : ९१
  • किरकोळ अपघात : ३३, किरकोळ जखमी : ८३
  • विना जखमी अपघात : २०

पावसाळ्यात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. रस्त्यांवरील सिग्नलकडे लक्ष द्यावे. पालकांनी अल्पवयीन पाल्याच्या हातात वाहन देऊ नये. दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास नक्कीच अपघात होतील. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहनचालकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असल्याने अपघात कमी झाले आहेत तसेच मृत्यूची संख्याही घटली आहे. वाहनचालकांनी वाहन जपून चालवावे. - फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू