सामाजिक बांधिलकीतून मदत
चिपळूण : शहरातील रॉक फिटनेस जिम व द पार्ट पार्टी हाउस या प्रसिद्ध फार्म हाउसच्या संचालिका प्रियांका अमित मिरगावकर यांच्यातर्फे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अन्नधान्याचे २०० किट्स वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे वाटप १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. रॉक फिटनेस जीमसमोर, वांगडे मोहल्ला शेजारी, बहादूरशेख नाका या ठिकाणी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात येणार आहे.
वेदांत महाडिक प्रथम
चिपळूण : सती-सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) चिपळूण या विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत महेंद्र महाडिक महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाइन घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम आला आहे. १४ नोव्हेंबर बालदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत ‘बालदिन’ या फेसबुकपेजवर विद्यार्थ्यांचे व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत भरघोस असा सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला होता.
प्राइम डायग्नोस्टिक सेंटरतर्फे साहित्य वाटप
रत्नागिरी : काेरोनाच्या संकटात जनतेच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांना रत्नागिरितील प्राइम डायग्नोस्टिक सेंटरतर्फे मोफत मास्क, फ्रुटज्यूस आणि सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला प्राइम डायग्नोस्टिक सेंटरच्या रेडिओलॉजिस्ट डॉण तरन्नुम खलीफे, ॲडमिन समीक्षा बने, टेक्निशिअन अभिजीत मोरे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, सहायक निरीक्षक भोसले, तसेच रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन व परिसरातील सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.