रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुन्हा ५८२ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३९,६३३ इतकी झाली असून कोरोनाने आतापर्यंत १३३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. त्यामुळे पाच दिवसांतील संख्या ३१९४ इतकी झाली आहे. शनिवारी एकाच दिवसात ५८२ जण पाॅझिटिव्ह आले. १४१६ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये ३७४ पाॅझिटिव्ह आले, तर १९७४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात २०८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यात राजापूर तालुक्यातील ३, रत्नागिरी ४, चिपळूण २ आणि संगमेश्वर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यात जिल्ह्यातील सहा पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३३० जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण १७.८२ टक्के असून मृत्यू झालेल्यांची टक्केवारी ३.३५ इतकी आहे.