रत्नागिरी : आषाढी एकादशी व बकरी ईद सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुमारे ६९० पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच १९ तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शांतता व जातीय सलोखा अबाधित राखण्याकरिता जिल्हा पोलिसदलातर्फे पोलिस स्थानक स्तरावर मोहल्ला समिती, शांतता समिती, गावातील सर्व धर्मांचे प्रमुख व्यक्ती, समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहेत. पोलिसांतर्फे या बैठकांमध्ये गोवंश प्राणी यांची अवैध वाहतूक होणार नाही याबाबत सूचना देण्यात येत आहेत. सण-उत्सव अनुषंगाने गावामध्ये वादविवाद असल्यास त्याचा तात्काळ तोडगा काढण्याबाबत व योग्य न्यायनिवडा होण्याबाबत ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबतही सर्व स्तरांवर सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सणानिमित्त ६९० पोलिसांचा बंदोबस्त तैनात, १९ नाक्यावर तपासणी
By अरुण आडिवरेकर | Published: June 28, 2023 7:24 PM