रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून, शुक्रवारी दिवसभरात ७३ रुग्ण सापडले. तर ३० रुग्ण बरे झाले असून, कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधित ४२८ रुग्ण गृह विलगीकरणात असून, २७३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात ३,०३९ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात मंडणगड, खेड तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण, दापोलीतील ९, गुहागरातील १३, चिपळुणातील १५, संगमेश्वर मधील ४, रत्नागिरी मधील १९, लांजातील २ आणि राजापुरातील ५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या ७७,६०० इतकी झाली आहे.
जिल्ह्यात ७४,४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के आहेत. चिपळुणात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २,४१० झाली आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.११ टक्के आहे. तर जिल्ह्यात ७०१ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.