गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या २१ जुलैला होणाऱ्या आमसभेसाठी गुहागर तालुक्यातून विविध खात्यांसाठी सुमारे ८० तक्रार व मागणी अर्ज झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागासाठी सर्वाधिक १३ अर्ज आले असून, त्यातून रस्त्यांचीच मागणी अधिक आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागासाठी आलेल्या २३ निवेदनांमध्ये नवीन रस्ते, खडीकरण व डांबरीकरण करणे, रस्त्याची दुरवस्था यांचा समावेश आहे. महावितरण कंपनीसाठी १० अर्ज आले आहेत.बांधकाम विभागासाठी ११ अर्ज, दूरध्वनी विभाग ६ अर्ज, आरोग्य विभागासाठी ५ अर्ज आले आहेत. आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. पंचायत समितीसाठी ४, तालुका कृषी विभाग ४ अर्ज, महसूल विभागासाठी २ अर्ज, लघु पाटबंधारे विभागासाठी पाझर तलावासंदर्भात २ अर्ज, पत्तन अभियंता विभाग संरक्षण भिंत बांधणे ३ अर्ज, नवीन एस. टी. बस सुरु करावी, यासाठी २ अर्ज, शाळेला कंपाऊंड बांधण्यासाठी शिक्षण विभाग १ अर्ज, गॅस पाईप लाईनमुळे सार्वजनिक विहिरींना धोका उद्भवल्याने गेल इंडिया कंपनीसाठी १ अर्ज तसेच कौंढर येथील दारुबंदीसाठी १ अर्ज आला आहे. नेहमीप्रमाणे याहीवेळी सर्वाधिक मागण्या या रस्त्याबाबतच्याच आहेत. (प्रतिनिधी)
गुहागर आमसभेसाठी ८० तक्रार अर्ज सादर
By admin | Published: July 15, 2014 11:35 PM