शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ८० कोटींचे नुकसान; नद्यांना पूर आल्याने लांजा, राजापुरात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:57 PM

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात अंदाजे एकूण ८२ कोटींचे नुकसान झाले असून ४७२ दुकानांचे ८० कोटींचे नुकसान झाले आहे.यंदा पावसाने जून महिन्यापासून सातत्य राखले आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून तर पावसाने मुसळधारेने पडण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात तर पावसाने एकही दिवस खंड पाडलेला नाही. बुधवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. रात्रभर पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळीही जोर कायम होता. ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने तासभर विश्रांती घेतली. मध्येच काहीकाळ सूर्यदर्शनही झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या.मध्यंतरी पावसाचा जोर कमी झाल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पाणी ओसरल्याने धोका पातळीहून इशारा पातळीच्या वर आले होते. पण बुधवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने गुरुवारी या नदीबरोबरच काजळी नदीची पाणीपातळीही इशारा पातळीच्यावर पोहोचली आहे. तसेच पावसाबरोबर वादळी वारेही असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, संरक्षक भिंती आदींच्या पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढल्याने लांजा, राजापूरमध्ये पाणी भरले. सायंकाळनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला.

१ जून ते १८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात झालेले नुकसान

  • मृत्युची संख्या : ४
  • जखमी व्यक्ती : ७
  • घरे : ३३६
  • गोठे : ५२
  • सार्वजनिक मालमत्ता : ५८
  • खासगी मालमत्ता : ४०
  • मृत जनावरे : ११
  • दुकाने : ४७२
  • पुरामुळे स्थलांतर : ७३ कुटुंबातील ३०७ व्यक्ती
  • दरडीमुळे स्थलांतर : ४ कुटुंबातील ११ व्यक्ती
  • अंदाजे एकूण नुकसान : ८२,०५,७३,१८९ रुपये
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर