शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 7:24 PM

Wildlife Turtal Ratnagiri- गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

ठळक मुद्देतवसाळ किनारी आढळली कासवांची ८७२ अंडीजिल्ह्यात घरटी, अंडी मिळण्याची पहिलीच वेळ

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.तवसाळ समुद्रकिनारी पूर्वी मोठ्या प्रमाणात या जातीच्या कासवांची अंडी सापडतात. कालांतरानंतर जेएसडब्ल्यू बंदर व चौगुले उद्योग समुहाचे बंदर विकसित झाल्यानंतर या ठिकाणी समुद्रातील वाहतुकीची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडात या समुद्रकिनारी मादी कासवांचे अंडी घालण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. मात्र, यावर्षी कासवप्रेमींना ही आगळीवेगळी पर्वणी निर्माण झाली आहे.गावातील कासवप्रेमी युवक महेश सुर्वे हा गेली दोन वर्षे वनविभागाशी संबंधित आहे. या युवकाच्या लक्षात आल्यानंतर कासवांच्या अंड्यांबाबतची माहिती त्याने तातडीने गुहागर तालुक्याचे वनपाल यांना दिली. त्यानंतर वन विभागाने तातडीने सर्व अंड्यांचे जतन व संरक्षण केले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी कासवांच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कासव महोत्सवही होऊ शकलेला नाही. आता अंडी सापडू लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.

वन विभागाच्या समन्वयातून व सहकार्यातून दापोली तालुक्यातील केळशीच्या धर्तीवर तवसाळमध्येसुद्धा कासव महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कासव महोत्सवामुळे तवसाळमधील पर्यटनात वाढ होऊन ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महोत्सवानिमित्ताने पर्यटकही याठिकाणी दाखल होतील.- नीलेश सुर्वे,अध्यक्ष, कांदळवन समिती, तवसाळ 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी