शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

वणव्यात पेटलेले वडाचे झाड कोसळले, संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

By अरुण आडिवरेकर | Published: June 10, 2023 2:13 PM

वृक्ष कोसळला त्या दरम्यान मार्गावरुन कोणतेही वाहन जात नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली

रत्नागिरी : संगमेश्वर - देवरुख राज्यमार्गावर करंबेळे सहाण येथे शुक्रवारी (९ जून) सायंकाळी ४:३० च्या सुमारास एक जुनाट वडाचे झाड कोसळून दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. बाजूच्या शेतात लावलेल्या वणव्यात जळून हा वृक्ष काेसळल्याने ही दुर्घटना घडली.

वट वृक्ष कोसळला त्या दरम्यान सुदैवाने कोणतेही वाहन जात नसल्याने गंभीर घटना टळली. वट वृक्ष कोसळण्याआधी काही क्षण पांचाळ नामक दुचाकीस्वार तेथून गेले होते. जोरदार आवाज झाल्याने त्यांनी मागे वळून पाहिले तर वडाचे अजस्त्र झाड कोसळलेले त्यांना दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपले कर्मचारी मठकर यांना घटनास्थळी पाठवून वटवृक्षाला लागलेली आग विझविण्यासाठी टॅंकरची व्यवस्था केली. शासकीय ठेकेदार संदीप रहाटे यांनी जेसीबी घेऊन चालक पिंट्या चव्हाण यांना वटवृक्ष बाजूला करण्यासाठी घटनास्थळी पाठवले. पोलिस नाईक सचिन कामेकर आणि माजी सरपंच शरद पवार यांनी काेसुंब येथील महावितरण विभागाला माहिती देऊन वीजप्रवाह बंद करण्यास ऑपरेटर किरण लिंगायत यांना सांगितले.

संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी स्वतः उभे राहून आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच वाहनांच्या रांगा लावून घेतल्या. करंबेळे गावचे पोलिस पाटील सुवारे, माजी सरपंच शरद पवार अन्य ग्रामस्थ यांनी वटवृक्ष हलविण्यासाठी मेहनत घेतली. मार्गावरील वाहतूक दाेन तास ठप्प हाेती. दोन तासात संगमेश्वर आणि देवरुख या दोन्ही मार्गावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा महाकाय वटवृक्ष जेसीबी चालक पिंट्या चव्हाण यांनी बाजूला केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी