शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Ratnagiri: अर्जुना धरणावर अपघात; दोघांना गमवावा लागला जीव, चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:05 PM

वाहन धरणात कोसळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

राजापूर : अर्जुना धरणातील कमी झालेली पाण्याची पातळी आणि धरणाच्या पहिल्या टप्प्यावर अपघातग्रस्त गाडी अडकून पडल्याने बुधवारी मोठी जीवितहानी टळली. या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून, आठजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा चालक राहुल गणेशवाडे (मिरज) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोही या अपघातात जखमी झाला आहे.अर्जुना प्रकल्प क्षेत्रात बुधवारी झालेल्या अपघातानंतर जोरदार टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी काहीजण त्या धरणात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. धरण क्षेत्रात वाहने जातातच कशी, असा प्रश्नही केला जात आहे.अर्जुना धरण प्रकल्पाअंतर्गत लांजा तालुक्यातील आरगाव येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामावरील दहा कामगार बुधवारी सायंकाळी उशिरा अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेले होते. अर्जुना धरणाकडे जाणारा मार्ग यापूर्वीच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला असल्याने धरण पाहण्यासाठी येणारे लोक तेथे आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत; मात्र तेथे जाणारा वेगळा मार्ग माहीत असल्याने ते दहा कामगार वाहन घेऊन धरण क्षेत्रावर गेले.सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांचे वाहन धरणात कोसळले. वाहनात बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. धरणाची भिंत दगडाची असल्याने गंभीर मार बसून, दोघांचा मृत्यू, तर उर्वरित जखमी झाले असावेत, असे बोलले जात आहे.

अपघातग्रस्त वाहन हे धरणाच्या पहिल्या टप्प्यावरच अडकून थांबल्याने व आतील कामगार बाहेर फेकले गेल्याने वाहनासह सर्व कामगार खाली पाण्यात पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.ग्रामस्थ धावलेअपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धरणाच्या दिशेने धावून गेली. त्यावेळी हा प्रकार समजला. सर्व जखमींसह दोन मृत कामगारांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांचे विच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह बिहारला रवाना झाले.

चौघे कोल्हापूरला

जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने बुधवारी रात्रीच त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य चौघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार आता आठही कामगारांची प्रकृती स्थिर आहे. दहापैकी आठ कामगार हे यूपी, बिहारमधील असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणAccidentअपघात