रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात मोठी दरड रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी - हातखंबा मार्गावरील निवळी घाटात आज सकाळी दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहने थांबवून ठेवण्यात आली आहेत. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन न आल्याने दुर्घटना टळली.