शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात

By अरुण आडिवरेकर | Published: May 22, 2023 9:04 PM

या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील इसार पेट्राेलपंप येथून टाटा कंपनीचा १० चाकी डम्पर चाेरीला गेला हाेता. ही घटना १४ मे राेजी रात्री ८:३० ते १५ मे राेजी सकाळी ७ वाजतादरम्यान घडली. या चाेरीचा पाेलिसांनी छडा लावला असून, हा डम्पर कर्नाटक येथून हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे (२२, रा. चवरे वस्ती, पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे (दोघेही रा. पेनुर, ता. मोहळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. निवळी येथील इसार पेट्राेलपंप येथून टाटा कंपनीचा १० चाकी डम्पर (एमएच ०८ - एपी २७६४) हा चोरट्याने चोरून नेला हाेता. या चाेरीची नाेंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली हाेती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू हाेता. या गुन्ह्यातील संशयित आराेपी लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे याला २२ मे रोजी गाणगापूर (ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला डम्पर, चाेरीसाठी वापरलेली कार व इतर साहित्य असा एकूण २८,६३,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे याच्याकडे अधिक चाैकशी केली असता गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे हे दाेघे सोबत असल्याची माहिती त्याने दिली आहे. या दाेघांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. हे दाेघेही स­राईत गुन्हेगार असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. या तिघांसह जप्त केलेला माल रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पाेलिस फाैजदार संजय कांबळे, पाेलिस हेड काॅन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर व पाेलिस काॅन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी