शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

शिवराज्याभिषेकाप्रसंगी जयजयकाराने आसमंत दुमदुमला, रत्नागिरीत महासंस्कृतीत महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन

By शोभना कांबळे | Published: February 15, 2024 1:01 PM

रत्नागिरी : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या निर्माता रत्नकांत जगताप यांच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने ...

रत्नागिरी : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या निर्माता रत्नकांत जगताप यांच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयजयकाराने सारा आसमंत दुमदुमला.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात बुधवारी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.स्थानिक कलाकार सुनिल बेंडखळे आणि राजेश चव्हाण यांनी सादर केलेला ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हा संगमेश्वरी बोलीच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे मनोरंजन केले. यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दमदार गणेश नमनाने झाली. या कार्यक्रमात सादर झालेल्या ‘बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल’, ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा गीतांमधून साकारलेल्या पंढरीच्या वारीने रसिकांनाही वारकरी बनविले. ‘झूंजूमुंजू पहाट झाली’, ‘नभं उतरु आलं..चिंबं थरथरवलं’ अशा उत्तमोत्तम गीतांमधून कृषीप्रधान भारताच्या हिरवाईचा साज साकारत होता. ठाकरं गीत, कोळी गीत आणि लावणी नृत्यातील अदाकारीने काही क्षण प्रेक्षकांना घायाळ केले.

रोमांचकारी पालखी नृत्य..नाचणे येथील नवलाई ग्रुपच्या सदस्यांनी प्रेक्षकांमधूनच ढोल, ताशांचा निनाद करत, रंगमंचावर पालखी आणली. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात हे पालखी नृत्य त्यांनी सादर केले. यामध्ये विशेषत: मुलांनी उभा केलेला मनोरा, डोक्यावर फिरवलेली पालखी, उभ्या केलेल्या मनोऱ्यावर उचललेली पालखी, परातीच्या काठावर उभे राहून डोक्यावर तोललेली पालखी असे अनेक चित्तथरारक साहसी प्रकारांनी अंगावर रोमांच उभे केले.

लोकधाराच्या मंचावर भव्य दिव्य नेपथ्याच्या सहाय्याने मोठ्या संख्येतील कलाकारांनी’आई अंबे.. जगदंबे’ या गोंधळ नृत्याविष्कार टाळ्यांचा कडकडाटात सादर झाला. पारंपरिक गीतांना नव्या पिढीतील गितांची जोड देत, युवा रसिकांसाठी डीजे मधील काही नृत्य सादर केले.

कार्यक्रम समारोपाकडे जात असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग कलाकारांनी जोशपूर्ण गितांनी आणि नाट्याने जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसह प्रेक्षकांसमोरुन रंगमंचावर पदार्पण करतात. सनई-चौघड्यांच्या मंगलमयी सुरात, तुतारी स्वरात सिंहासनाधिश्वर होतात. या प्रसंगाने मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षकघरी परतताना भारावलेले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी