शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पतीने पत्नी अन् मुलाचा केला निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने रत्नागिरी जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:35 AM

संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले

लांजा : पत्नी व सहा वर्षाच्या मुलाचा निर्दयीपणे खून करून पती पळून गेल्याची घटना गुरुवारी सकाळी लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे उघड झाली. या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संदेश चांदिवडे असे या संशयिताचे नाव आहे. त्याने आपल्या पत्नीला कोयतीने तर मुलाला उशी नाकावर दाबून मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले.कोट पाष्टेवाडी येथे संदेश रघुनाथ चांदिवडे याचा विवाह सांगली येथील सोनाली हिच्याबरोबर सन २०१६ मध्ये झाला होता. संदेश गावागावांत जाऊन विद्युत मीटरचे रिडिंग घेण्याचे काम करतो. या जोडप्याला प्रणव (६ वर्षे) आणि पीयूष (३) अशी दोन आहेत. हे कुटुंब लांजा डाफळेवाडी येथे भाड्याच्या जागेत राहत होते. दि. १९ जुलैला सोनाली घरातून निघून गेली होती. संदेशने ती बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलिस स्थानकात दिली. दि. २९ जुलैला ती सापडल्यानंतर संदेश तिला व दोन मुलांना घेऊन कोट पाष्टेवाडी येथे आपल्या घरी राहण्यासाठी गेला.बुधवारी रात्री जेवण झल्यानंतर प्रणव आई-वडिलांसोबत तर धाकटा पीयूष आजी लक्ष्मीजवळ हॉलमध्ये झोपला. सकाळी लक्ष्मी चांदिवडे जाग्या झाल्या, तेव्हा संदेश खोलीत दिसला नाही. नातू प्रणवला अंथरुणातून उचलून त्यांनी हॉलमध्ये आणून झोपवले. मात्र घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना आपली सून सोनाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले.पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, प्रवीण देसाई, हेडकॉन्टेबल अरविंद कांबळे, भालचंद्र रेवणे, सचिन भुजबळराव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, प्रिया कांबळे, बाबूराव काटे, जितेंद्र कदम, नितीन पवार, चेतन घडशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी तेथे भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या.

भांडण झाल्याचा अंदाजपहाटे पती-पत्नीचे भांडण झाले असावे. त्यातून संदेशने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रणवचा मृत्यू गुदमरून झाला आहे. संदेशने तोंडावर उशी दाबून त्याला मारले असावे आणि सोनाली बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिच्या मानेवर कोयती मारली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोनालीची मान अर्धवट तुटल्यासारखी झाली होती.

संदेश गेला पळूनहा प्रकार झाल्यापासून संदेश चांदिवडे पळून गेला आहे. त्यामुळे त्यानेच हे दोन्ही खून केले असल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. श्वानपथकही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस