गणपतीपुळे : बोटीच्या पेरच्यावर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे गुरुवारी घडली असून, शनिवारी त्याचा मृतदेह सापडला. शिवदयाल मनशाराम रायदास (२६, रा.कच्छिनखेडा सुसुमऊ, उन्नव, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.जयगड येथील खाडीत शिवदयाल रायदास हा गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान दारू पिऊन बाेटीच्या पेरच्यावर बसला हाेता. काही वेळाने त्याचा ताेल गेला आणि ताे खाडीत पडला. त्यानंतर, त्याचा सर्वत्र शाेध घेण्यात आला. मात्र, त्याचा कुठेच शाेध लागला नाही.दरम्यान, शनिवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान जयगड साखर माेहल्ला येथे खाडीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना एक मृतदेह दिसला. या मृतदेहाची खात्री केली असता, ताे शिवदयाल रायदास याचा असल्याची खात्री झाली. त्याला तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले हाेते. या प्रकरणी जयगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
दारू पिऊन बोटीच्या पेरच्यावर बसला, तोल जाऊन खाडीत पडला; तीन दिवसानंतर खलाशाचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:00 IST