शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

Ratnagiri news: कार-स्कूल बसला भीषण अपघात, कार उलटली; बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले

By संदीप बांद्रे | Published: March 20, 2023 1:27 PM

कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ डिगेवाडी बस स्थानकासमोर आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता कार व स्कूल बसला समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बालंबाल बचावले.येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता ठेवून काम केली जात आहेत. मात्र त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात यातूनच झाला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कार चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडकडे निघाला होता. कामथे डिगेवाडी बस स्थानकासमोर स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच पलटी झाली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तातडीने स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना गाडी बाहेर काढण्यात आले. ते सर्वजण सुखरूप होते. कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा पोलिसांमार्फत सुरु आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातStudentविद्यार्थी