शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

मुंबई-गोवा महामार्गावरील भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

By संदीप बांद्रे | Published: June 19, 2023 7:14 PM

स्थानिक चित्रकार आणि मुंबईतील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ही चित्रे रेखाटण्यात आली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बांधलेल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंतीवर कोकणातील सौंदर्य रेखाटण्यात आले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भिंती आता आकर्षित करू लागल्या आहेत. स्थानिक चित्रकार आणि मुंबईतील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चिपळूण विभागांतर्गत परशुराम ते आरवलीपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्यात कामथे हा महत्त्वाचा घाट रस्ता आहे. घाटात दरडी कोसळून माती रस्त्यावर येऊ नये यासाठी डोंगर भागाच्या बाजूने भिंती उभारण्यात आल्या आहेत. या भिंती रंगविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली हाेती. या भिंतीवर कोकणातील लोकसंस्कृती, जीवनशैली, ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक संपत्ती, शेतीवर आधारित जीवन, मत्स्य व्यवसाय असे एकापेक्षा एक सुंदर विषय घेऊन चित्रे साकारण्यात आली आहेत.

कोकणातील शेतीची विविध कामे खाद्य, वाद्य संस्कृती नृत्यकला, बैलगाडी, समुद्र, मासेमारी, निसर्ग अशा विविध छटा कलाकारांनी साकारल्या आहेत. सावर्डेहून चिपळूणला येताना आणि चिपळुणातून सावर्डेकडे जाताना या भिंती नजरेस पडतात. भिंतींवर साकारण्यात आलेली सुंदर चित्रे नागरिकांचा प्रवास सुखकर करत आहेत.

सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण काही दिवसापूर्वी चिपळूण दाैऱ्यावर आले होते. त्यांनी घाटात उभारलेल्या भिंती रंगवण्याची कल्पना सुचवली होती. त्यानुसार या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. - श्याम खुणेकर, कनिष्ठ अभियंता चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग