राजापूर : रिफायनरीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आसपासचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बारसूच्या माळरानावर गोळा होऊ लागले आहेत. मात्र कडाक्याच्या उन्हामुळे एका महिलेला चक्कर आल्याचा प्रकार घडला आहे. या महिलेने रुग्णालयात जाण्यास विरोध केला आहे.रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू, धोपेश्वर परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी आता लोक गोळा होऊ लागले आहेत. आंदोलन, विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात तणावाची स्थिती आहे.माळरानावर आता लोक जमू लागले असून, त्यातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास सुरू झाला आहे. आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने रुग्णालयात जाण्यास ठाम नकार दिला आहे.
रिफायनरी विरोधातील आंदोलनातील महिलेला उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात जाण्यास नकार
By मनोज मुळ्ये | Published: April 24, 2023 2:15 PM