रत्नागिरी : शासन आता सर्वच कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याच्या वृत्ताने आधारकार्ड नसलेल्या लोकांची पळापळ होणार आहे. जिल्ह्यातील ३१ आधारकार्ड केंद्रावर नागरिकांची पुन्हा पळापळ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ लाख २६ हजार ५९५ जणांची आधारकार्डची नोंदणी पूर्ण झाली आहे.१ जानेवारीपासून जिल्ह्यात स्पॅन्को कंपनीतर्फे आधार कार्ड नोंदणीस सुरूवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५, तर स्पॅनको कंपनीकडूनही यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. आॅक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ५९५ जणांची आधारची नोंदणी पूर्ण झाली होती. ९७ हजार ४८५ जणांची आधारकार्ड तयार झाली आहेत. पुन्हा आता युनिक कार्ड म्हणून आधारकार्डचा वापर केला जाण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्यांना पुन्हा आता या कार्डचा आधार घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)दापोली (३)वाकवली - २, फणसू खेड (२) भरण, खेड शहर चिपळूण (७) महा ई सेवा केंद्र,पेठमाप - २, इब्राहिम कॉम्प्लेक्स(जुना स्टॅन्ड) - २, सावर्डे पिंंपळ मोहल्ला, सावर्डे बाजारपेठ, गुहागर (३) शृंगारतळी, खोडदे - २ संगमेश्वर (३) म्हाबळे (२), वेल्हाळ कंपाऊंड बाजारपेठ देवरूखरत्नागिरी (९)रत्नागिरी शहरामध्ये लाला कॉम्प्लेक्स, गणेश संकुल पऱ्याची आळी, महा-ई सेवा केंद्र जयस्तंभ, मुरूगवाडा, नाचणे, वाटद खंडाळा, कोतवडे बाजारपेठ, महा-ई सेवा केंद्र निवळी, पावस.लांजा (२)लांजा शहर, भांबेड राजापूर (२) राजापूर शहरात जमीर आर्केड (पोलीस स्थानकाजवळ), पाचल
आधारकार्ड होणार सर्वांसाठी अनिवार्य
By admin | Published: November 25, 2014 10:29 PM