शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

आरे-वारे समुद्रात पाच पर्यटकांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:44 PM

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि ...

रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि मॅथ्यू डिसुजा (१८, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) यांचा बुडून मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील डिसुजा आणि मास्टर कुटुुंब उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी दुपारी डिसुजा आणि मास्टर कुटुुंबातील सातजणांनी आरे-वारे समुद्र्रकिनारा गाठला. याठिकाणी मौजमजा करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. केवळ रिटा डिसुजा (७०) या पाण्याच्या भीतीने पाण्यात उतरल्यानाहीत. त्यांनी काठावरच उभे राहणे पसंत केले.पाण्याला ओहोटी असल्याने सहाहीजण पाण्यात खेचले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने सहाहीजण पाण्यात बुडू लागले. यावेळी आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लिना मास्टर यांच्या हाताला किनाऱ्यानजीकचा दगड लागल्याने त्यांनी दगडाच्या मदतीने किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. उर्वरित पाचजण वाहून गेले.स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामस्थ सागर शिवलकर, विवेक कनगुटकर, जीवन मयेकर, रूपेश वारेकर, महेश वारेकर यांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या पाचजणांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, पाण्याला ओहोटी असल्याने पाचहीजणांचे मृतदेह समुद्र्रातील दगडांमध्ये फसले होते. स्थानिक तरूणांनी मोठ्या जिकीरीने एकएक मृतदेह बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात बुडालेले पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.या दुर्घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारीदेखील तत्काळ मदतीसाठी दाखल झाले होते.फाजील आत्मविश्वासदोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबीय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली. आरे-वारेतील स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे प्रशासनाने पाचहीजणांचे मृतदेह बाहेर काढले.