शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

खेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:38 AM

खेड : नगर परिषद निवडणूक पुढील काही कालावधीत होण्याची शक्यता असल्याने खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. ...

खेड : नगर परिषद निवडणूक पुढील काही कालावधीत होण्याची शक्यता असल्याने खेडमध्ये दलबदलू राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही महिन्यात पक्ष प्रवेशांचे कार्यक्रम वाढले असल्याचे दिसून येत आहे. या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. नगरपरिषद निवडणूक उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवून पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. नगर परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सारेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल याचा अभ्यास करून राजकीय पक्षाचे नेते कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करू लागले आहेत. ज्यांना या निवडणुकीत १०० टक्के उमेदवारी मिळणार याची खात्री आहे ते पदाधिकारी पक्षासोबत आहेत परंतु ज्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री नाही ते पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करण्यात वेग घेतला आहे.

गेल्या काही महिन्यात खेड शहरातील अन्य पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. जे पदाधिकारी अन्य पक्षातून शिवसेनेत दाखल होत आहेत त्यामध्ये काही जणांनी यापूर्वी आपापल्या पक्षाचे नगरसेवक पद उपभोगलेले आहे. मात्र यावेळी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने किंवा मतदारांचा बदललेला कल तसेच अन्य काही स्थानिक राजकीय परिस्थिती ओळखून शिवबंधन हाती बांधत आपल्या उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा खेडच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि खेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. चिखले यांच्या सेना प्रवेशानंतर महाराष्ट नवनिर्माण सेनेला राजकीय धक्का बसला तर शहर शिवसेनेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्या नंतर शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा धडाका लावला होता.

अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश सुरु असतानाच आता पुन्हा एकदा खेडच्या राजकारणात भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि खेड नगरपरिषदेचे माजी नागसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आपल्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे चिकणे यांनी म्हटले आहे. मात्र राजकीय समीक्षकांना हे कारण पटणारे नाही. गेल्या निवडणुकीत चिकणे यांचा पराभव झाल्याने त्यांना या वेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी हातात शिवबंधन बांधल्याचे बोलले जात आहे. राजकीय समीक्षकांनी काढलेला हा निष्कर्ष किती खरा आणि किती खोटा हे येणार काळ ठरवेल.

राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात अन्य पक्षाचे आणखी काही पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. जर ही माहिती खरी असेल तर येत्या काळात खेड नगर परिषदेवर शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे सहज शक्य होणार आहे.