रत्नागिरी : रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला दुसऱ्या कारने जाेरदार धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात काेणालाही दुखापत झाली नसली तरी दाेन्ही गाड्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबत रवींद्र नारायण झगडे (४२, रा. जयगड, तेलीवाडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र झगडे यांनी त्यांची इको गाडी (एमएच ०८ - एएन ४३६५) प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शेजारी रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेली हाेती. त्या गाडीत ते झाेपलेले हाेते. त्याचवेळी मारुती मंदिरहून एस. टी. स्टॅण्डच्या दिशेने जाणाऱ्या आय २० गाडीने (एमएच ०८ - झेड ५७७२) इको गाडीला जोरदार धडक दिली. ही गाडी जाहिद शौकत बोरकर (२२, रा. हयातनगर, रत्नागिरी) हे चालवत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हेडकाॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करीत आहेत.
-------------------------
रत्नागिरी शहरातील मनाेरुग्णालयाशेजारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला ठाेकर देऊन झालेल्या अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. (छाया : तन्मय दाते)