शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Ratnagiri: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरची कठड्याला धडक, दहा जण जखमी; खेडनजीक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 11:43 AM

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील ...

खेड : गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. बुधवारी, दि. ३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. मुंबई) हा ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ६९०१) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा (५४), अंजली सतीश सबसुळे (५२), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), चेतना बाबालाल ठाकूर (४३), नितीन रायचुरा (५६), जितेंद्र लालसिंग ठाकूर (४४), सतीश विठ्ठलराव सबसुळे (५८), ओमप्रकाश गंगाराम गोंधळे (६०, सर्व रा. अमरावती) हे प्रवासी होते.हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले. तेथून ते गोव्याला गेले. बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावांदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात चारपदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना डोके, हात, पाय, छातीला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णवाहिकांची मदतशासनाची १०८ सेवा, शिवतेज आरोग्य सेवा संस्था, शिवसेना, प्रसिद्धी रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणिजची रुग्णवाहिका यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्या.

मदतीसाठी अनेकजण पुढेया अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिलिंद काते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली व त्यांना मदत केली.

तज्ज्ञांअभावी फक्त मलमपट्टीचकळंबणी येथे असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा प्रकर्षाने जाणवत होती. या ठिकाणी एकही ऑर्थोपेडिक सर्जन नसल्यामुळे मलमपट्टी करण्याखेरीज कोणतेही उपचार जखमींना मिळाले नाहीत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात