रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ५७ ठिकाणी नाकांबदी केलेली आहे. १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत ४०,८५० वाहनांवर कारवाई करण्यात आली.
नाकांबदीच्या ठिकाणी एकूण वाहने २९,३४९ एवढी वाहने तपासली. तसेच नाकाबंदीच्या काळात वाहनामधील ५१,८९२ एवढी लोकांची तपासणी केली. मोटार वाहन कायदा अंतर्गत एकूण ४०,८५० एवढ्या केसेस केल्या व त्यातून १,०६,१०,७०० एवढा दंड वसूल केला. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध ४,६८१ एवढ्या केसेस केल्या, तर त्यांच्याकडून दंड २१,९८,४०० इतका दंड वसूल केला. जिल्ह्यात जप्त केलेली वाहने ७ एवढी आहेत. कोविडच्या अनुषंगाने दाखल केलेल्या गुन्ह्याची संख्या ७९, तर विनाकारण फिरत असलेल्या २५७५ अशा नागरिकांची अँटिजेन चाचणी केली. त्यामध्ये १८३ नागरिक पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.